गड व किल्ले वाचवा

महाराष्ट्राची अस्मिता ज्या म्हणून ओळखले जाणारे आमचे गड किल्ले भग्न दुरवस्था अवस्थेत आहेत, सरकार काहीच विशेष प्रयत्न करीत नाही. हे गड किल्ले केवळ गड किल्ले किंवा दगड माती नाहीतर छत्रपतींचे खरे स्मारक आहेत, मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत. ज्यांना जे कोणी पडके किल्ले बोलतात ना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आम्ही कोणासमोर माना झुकवल्या नाहीत. इतरांनी माना वाकवल्या भिंती वाचवल्या.
ह्याच गड किल्ल्यांचे सुद्धा सरकारला खाजगीकरण करण्याचे डाव आहे, कारण काही किल्ल्यांवर हॉटेल्स सुरु करण्याचे प्रयत्न करत आहेत, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी अशी माहिती दिली. उद्या खाजगी हॉटेल्सने जर हे किल्ले खाजगी संपत्ती झाली तर याला कोण जाबाबर? कारण आपल्याकडे वनखात्याची जागेवर अनधिकृत चाळी उभ्या राहतात. मग या गड किल्ल्यांची असे होणार नाही कशावरून?
खुद्द महाराजांनी सुद्धा गड किल्ल्यांना आपली स्वतःची संपत्ती मनाली नव्हती, सरकारने अशी किल्ले खाजगी हॉटेल्स देणे योग्य आहे का? या हॉटेल्स म्हटलं की मद्यपाण आलं हे उद्या ह्या हॉटेल्स मध्ये मद्यपाण किंवा अन्य कोणत्या गोष्टी होणार नाहीत ह्याची हमी कोण घेणार? असे झाले तर हे खरे शिवभक्त कसे सहन करू शकतात का?

तिथे नको ते प्रकार चालणार नाहीत हे कशावरून, गडकिल्ले हे अनेक संस्था व संघटना हे आज आहेत त्यांनी सरकारच्या कोणत्याही मदती शिवाय गड संवर्धनसाठी प्रयत्न करीत आहेत, सरकारने त्यांना मदत केली तरी आज महाराष्ट्रातल्या गडांचा विकास होईल.

मान्य आहे की गड किल्ल्यांचे विकास व्हावा पण त्यासाठी आणखी सुद्धा पर्याय आहेत, अरबी समुद्रात होणारा महाराजांचा स्मारकाचा पैसा हा आपल्या किल्ल्यांच्या संवर्धनसाठी करावे तसेच इतर राज्य त्यांच्याकडेच्या किल्ल्यांची मार्केटिंग करतात तशी मार्केटिंग महाराष्ट्र सरकारने सुद्धा करावी. ज्या महाराष्ट्रात सर्वात जास्त किल्ले आहेत, महाराजांनी त्यावेळी किल्ले बांधण्याचे अनेक हेतू होते त्यातील प्रमुख कारण रोजगार निर्मिती करणे होते. जास्तीत जास्त पर्यटक किल्ल्यांवर कसे येतील त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

हे काम थोडं कठीण आहे पण अशक्य नाही फक्त सरकारची ईच्छा पाहिजे, गुजरात मध्ये सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा सुमारे तीन वर्षांच्या काळात पूर्ण होऊ शकते.