भागवत धर्म : हिंदू धर्माचा गाभा असलेला मोक्षप्राप्त्यर्थ एकेश्वरभक्तीला प्राधान्य देणारा धर्म. ‘भगवत्’ या संस्कृत शब्दाचा ईश्वर असा अर्थ असुन ‘भागवत’ हे त्या शब्दापासून बनलेले विशेषण आहे. त्यामुळे भागवत धर्म म्हणजे भगवंताने सांगितलेला धर्म असा अर्थ होतो.