मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.
Discussion
मराठी वारसा
मराठी वारसा
Where am I?
In मराठीबांधव you can ask and answer questions and share your experience with others!
मराठी भाषा मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे वाढत आहे.
मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते
सध्या अगदी लग्नपत्रिकेपासून ते मुलाच्या बारशाच्या पत्रिकादेखील इंग्रजीमध्ये छापण्याची स्पर्धाच सुरू झालीये. यातून कसला वारसा आपण पुढच्या पिढीला देणार आहोत? किमान आपल्या मातृभाषेचा वापर जरी दैनंदिन बोलण्यात वाढवला, तरी नव्या पिढीला आपल्या भाषेची गोडी लागेल
भाषा म्हणजे भावनांची ओळख. भाषा म्हणजे विचारांची गुंफण. भाषा म्हणजे संवेदनांची जाणीव. भाषा म्हणजे आपुलकीचा साज. भाषा म्हणजे समृद्ध संस्कृतीचा वारसा.… मुळात भाषा म्हणजे संवादाचे साधन. ज्यातून भावनांची, विचारांची, आत्मिक संवेदनांची, देवाण-घेवाण व्हावी असे एक माध्यम.
आपल्या भारत देशाला विविध संस्कृती, परंपरा, तसेच विविध भाषांचा वारसा लाभलेला आहे. कदाचित म्हणूनच की काय आपल्या देशात भाषावार प्रांतरचना किंवा प्रांतवार भाषेची रचना लाभलेली आहे. त्याच आधारे मराठी भाषिकांचे राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य; परंतु आता या राज्यातच कितपत लोक मराठी बोलतात हा चर्चेचा विषय होऊ शकतो.
मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा तसा थोर. अगदी ज्ञानेश्वरांपासून ते आजपर्यंतच्या नवलेखकांपर्यंत प्रत्येकाने आपली मराठी भाषा जगवली, जोपासली आणि समृद्ध केली. आज २७ फेब्रुवारी. कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. विष्णू वामन शिरवाडकर. यापेक्षा 'कुसुमाग्रज' ही त्यांची सर्वज्ञात ओळख. शिरवाडकरांनी त्यांचे सर्व लिखाण कुसुमाग्रज याच नावाने केले. अगदी जगविख्यात नाट्य 'नटसम्राट' ते 'ओळखलंत का सर मला...'पासून सुरू होणाऱ्या 'कणा' या कवितेपर्यंत त्यांच्या बहारदार लेखणीने मराठी वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. त्यांना त्यांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल सरकारने १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविले आणि त्यानंतर त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा, असे जाहीर केले
आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेक संस्था-संघटना कार्यरत आहेत, प्रयत्न करत आहेत. फक्त हा दर्जा मिळाल्याने खरंच असं काही साध्य होणार आहे का? कारण ज्याच्यासाठी हे सर्व सुरू आहे, त्यांना त्या भाषेविषयी प्रेम राहिले का? फक्त मराठी भाषा दिनाला भाषेविषयी गौरवोद्गारदर्शक पोस्ट टाकून किंवा महाराष्ट्र दिनाला मराठी भाषेचे गोडवे गावून दिखाऊ प्रेम नक्की व्यक्त होईल; परंतु बाकीचे ३६३ दिवस भाषा जगणार कशी? रुजणार कशी?
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करताना खेड्यापासून शहरापर्यंतचा राहणीमानाचा दर्जा बदलत गेला. राहणीमानाबरोबरच भाषेमधील बदलदेखील जाणवू लागला. जी मराठी आपली मातृभाषा आहे तिची जागा आता हिंदी, इंग्रजी भाषांनी घेतली. मराठी शाळांची जागा इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी घेतली. या शाळांमधून मराठी शाळेत शिकवली जाणारी मराठी प्रार्थना, पसायदान हेदेखील हद्दपार व्हावे यासारखी लाजीरवाणी बाब आपल्यासाठी दुसरी कोणती नसावी. मराठी भाषिक राज्यातच शाळांमधून मराठी भाषा शिकवणं बंद होऊन गेलं. कदाचित यामुळेच सरकारला यामध्ये हस्तक्षेप करून मराठी भाषा शिकविणे सर्व शाळांसाठी अनिवार्य करावे लागले.
अशाप्रकारे बंधन घालून नियम करून खरंच आपण नवीन पिढीत मराठी भाषेची गोडी निर्माण होईल? त्यांच्या मनात भाषेविषयी प्रेम निर्माण होईल? की पालक म्हणून हे संस्कार रुजवण्यात आपणच कुठे कमी पडतोय की काय याचंही अवलोकन होणं गरजेचं आहे? या दिवशी आपण भाषा जपली पाहिजे, जोपासली पाहिजे, नवीन पिढीमध्ये ती रुजवली गेली पाहिजे असे म्हणतो; परंतु खरंच त्यासाठी कृतिशील अशी उपाययोजना करतोय का? किमान आपल्या वागणुकीतून तरी तशी प्रेरणा मिळतीये का?
सध्या अगदी लग्नपत्रिकेपासून ते मुलाच्या बारशाच्या पत्रिकादेखील इंग्रजीमध्ये छापण्याची जणू स्पर्धाच सुरू झालीये. यातून कसला वारसा आपण पुढच्या पिढीला देणार आहोत? किमान आपल्या मातृभाषेचा वापर जरी दैनंदिन बोलण्यात वाढवला तरी नव्या पिढीला आपल्या भाषेची गोडी लागेल.
मराठी भाषेवर हिंदी किंवा इंग्रजी भाषेचे अतिक्रमण होत आहे, असे नेहमीच म्हटले जाते; परंतु त्याचाही कधी गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. याचे भविष्यातील धोके सर्वज्ञात असूनही आपण सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करतो. या भाषेच्या अतिक्रमणात पुढची पिढी दिशाहीन होऊन जाईल की काय, अशी भीती निर्माण होत आहे; कारण त्यामुळे कोणत्याच भाषेचे सखोल ज्ञान प्राप्त होत नाही. त्यामुळे व्यवहारातील दैनंदिन बोलण्यातही नवीन पिढी ना पूर्ण मराठी बोलू शकते, ना हिंदी ना इंग्रजी बोलू शकत. या सर्वांची मिश्रित अशी नवीन भाषा प्रकाराची सुरुवात या पिढीत झालेली दिसून येते.
भाषा संवर्धनासाठी तिचा वापर वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. त्याला एकमेव पर्याय म्हणजे मराठी वाचनाची, लिखाणाची आवड या पिढीत निर्माण करणे; परंतु आजच्या फेसबुक, व्हॉट्स्अॅपच्या दुनियेत पुस्तकांशी संपर्क येणे दुरापास्त झाले आहे. जिथे मोबाइलमधील एखादा मेसेजदेखील पूर्ण वाचला जात नसेल तिथे पुस्तक वाचनात मुले रमताना कशी दिसणार?
शहरीकरणाच्या नावाखाली महाराष्ट्रात अनेक बदल घडून आले. भाषा फक्त संवादाचे साधन न राहता सामाजिक प्रतिष्ठेचा भाग होऊन गेली आहे. मराठी भाषिक राज्यांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषा बोलणे हे प्रतिष्ठादर्शक मानले जाऊ लागले आहे. अगदी जपानसारख्या देशापासून ते कर्नाटकसारख्या राज्यापर्यंत भाषेविषयी अभिमान बाळगणारी माणसे या जगात आहेत. जपानसारख्या देशाने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि हुशारीच्या जोरावर बाहेरील देशांतील नागरिकांनाही जपानी भाषा शिकण्यास प्रवृत्त केले. त्यांना कधीही दुसऱ्या भाषेचा आधार संवाद प्रस्थापित करण्यासाठी करावा लागत नसेल का?
भाषेचा गौरव वाढवण्यासाठी नुसत्या भावनिक विचारांचे प्रदर्शन न होता योग्य कृती होऊन भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढणे गरजेचे आहे. तरच आपल्या मराठी भाषेवर दीन अवस्था न येता, येणारा प्रत्येक दिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करता येईल.
भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.
मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे 'भाषा' ही संज्ञा 'बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय. कोणता ना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे. संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो.
थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे.
मराठी ही जगातील महत्त्वाची भाषा आहे.
सर्वसाधारण व्यवहारात 'भाषा' ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण कशाचा नेमका अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागते. भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा त्यामुळे भाषेची अधिक नेमकेपणाने व्याख्या करू इच्छिते. भाषेचे स्वरूप नेमकेपणाने उलगडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाहता, केवळ 'बोलणे' म्हणजे भाषा नव्हे, तर भाषा ही गोष्ट त्यापलिकडची, अधिक व्यापक अशी आहे, असे आज अभ्यासक मानतात. भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून असलेली गोष्ट असल्याने तिच्याकडे पाहण्याच्या विविध रीती आणि दृष्टिकोन संभवतात. साहजिकच तिच्या व्याख्याही निरनिराळ्या प्रकारे केल्या गेल्या आहेत. मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनीयुक्त असलेली यादृच्छिक संकेतव्यवस्था म्हणजे 'भाषा'होय.
वरील व्याख्येनुसार भाषा ही संकेतव्यवस्था असते, असे आपण पाहिले. याचा अर्थ आशय व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये काही ठरावीक खुणा वापरल्या जातात.जेव्हा भाषावैज्ञानिकांनी मानवी भाषांचा विचार केला, तेव्हा त्यांना या खुणा प्रामुख्याने ध्वनिरचनांच्या स्वरूपात आढळल्या. सुट्या ध्वनींच्या माध्यमातून नव्हे, तर त्यांच्या रचना करूनच अर्थ व्यक्त होत असतो. त्याचे कारण असे की माणूस व्यावहारिकदृष्ट्या वेगळे ओळखू येणारे किती ध्वनी उपयोगात आणू शकतो, याला मर्यादा आहेत. त्याला व्यक्त करायचे असणारे अर्थ मात्र अमर्याद आहेत. त्यामुळे मोजक्या ध्वनींच्या अनेक रचना करण्याचे तंत्र मानवी भाषेने विकसित केले असे म्हणता येईल. तसेच रेडिओ किंवा दुूरदर्शनचा संच बाहेरून बघितला तर खूपच सुबक आणि आकर्षक तारांच्या दिसतो. पण मागच्या बाजूने तो उघडला की त्याच्यात वेगवेगळ्या खूपच गुंतागुंतीच्या रचना केलेल्या आहेत असे दिसते. भाषेचे स्वरूप असेच गुंतागुंतीचे असते. प्रत्येकाला स्वतःची भाषा येत असल्यामुळे ती खूप सोपी आहे असे वाटत असते. पण कोणत्याही भाषेचे स्वरूप आपण समजावून घ्यायला लागलो की तिच्यात दूरदर्शन संचाप्रमाणे खूपच गुंतागुंतीच्या रचना आहेत असे लक्षात येते
भाषा ही संज्ञा विविध अर्थांनी वापरली जात असल्याने तिचे असे प्रकार करताना कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यावे लागते. स्वाभाविक, नैसर्गिक, कृत्रिम, सांकेतिक
भाषा आणि संवाद.
अतिप्राचीन काळी मनुष्यप्राण्याच्या शरीरातल्या इतर संस्थांसमवेत मज्जासंस्था, श्रवणसंस्था, कंठ, ओठ, जीभ, दात, नाक ह्या अवयवांची अतिआश्चर्यजनक उत्क्रांती झाली, आणि त्यायोगे तोंडाने तऱ्हेतऱ्हेचे आवाज (ध्वनी) करणे आणि दुसऱ्या प्राण्यांनी/मनुष्यांनी केलेले आवाज (ध्वनी) ऐकणे ह्या गोष्टी मनुष्यप्राण्याला शक्य झाल्या. त्या उत्क्रांतीच्या आणखी पलीकडे माणसाच्या मेंदूची उत्क्रांती अशी की विशिष्ट आवाजांना विशिष्ट मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके करण्याची कल्पना माणसाला सुचली. त्यानंतरचा माणसाच्या बुद्धीचा टप्पा म्हणजे वेगवेगळ्या मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके ठरलेल्या शब्दांना विशिष्ट रित्या वाक्यांच्या साखळ्यांमधे बांधून सभोवतीच्या माणसांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची माणसाला सुचलेली कल्पना. मुख्य म्हणजे विशिष्ट आवाजांच्या साखळ्यांच्या प्रतीकांद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्याकरता माणसांच्या "टोळ्यां"मधे प्रतीकांसंबंधात सर्वसंमतता अनिवार्यतः असावी लागणार होती आणि असावी लागते.
वर म्हटलेली "टोळ्यां"मधली शब्द आणि भाषेचे व्याकरण ह्यांबाबतची सर्वसंमतता गरजेपायी हळूहळू कशी तयार झाली असावी ही कल्पना खूप मनोरंजक आहे. कारण कुठल्याही "टोळी"मधली ती सर्वसंमतता कुठल्याही काळी टोळीतल्या अग्रणींच्या सभा भरवून टोळ्यांनी ठरवल्या नव्हत्या! कालौघात वेगवेगळ्या भाषांमधले व्याकरण हळूहळू ठरत गेले, वेगवेगळे शब्द प्रचारात आले, काही शब्दांचे अर्थ बदलले, काही प्रचलित शब्द अप्रचलित झाले. भाषांमधले शब्द आणि व्याकरणसुद्धा, दोन्ही गोष्टी कालौघात अनिवार्यतः हळूहळू बदलत असतात.
उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीसांना लिहून घेण्याकरता कथन केलेल्या एका पत्राच्या सुरवातीतली भाषा अशी :
त्याउलट शिवाजी महाराजांच्या आधी तब्बल चारशे वर्षे आयुष्य कंठून गेलेल्या संत जनाबाईंच्या नावे जे सुमारे ३०० अभंग प्रसिद्ध आहेत त्या सगळ्या अभंगांमधली भाषा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे हे मोठे कोडे आहे. उदाहरणार्थ संत जनाबाईंच्या नावे प्रसिद्ध असलेला एक अभंग असा:
चोखा मेळा,नामदेव, वगैरे इतर प्राचीन संतांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अभंगांमधली भाषासुद्धा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, आणि संत जनाबाई हे तिघेही समकालीन होते. असे असून फक्त ज्ञानेश्वरीतली भाषा जुन्या साच्यातली (प्राकृत) आहे.
काही भाषा फक्त "बोलभाषा" आहेत, म्हणजे बोललेल्या विचारांच्या शब्दप्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिह्ने/प्रतीके त्या भाषांमधे नाहीत. शब्दप्रतीकांशी सुसंगत लेखी चिह्ने/प्रतीके--म्हणजे भाषांच्या लिप्या-- तयार करण्याची कल्पना पुरातन काळी कोणत्या तरी कल्पक माणसाला ज्या दिवशी प्रथम सुचली तो दिवस चाक तयार करण्याची कल्पना माणसाला सुचलेल्या दिवसाइतकाच महत्त्वाचा खास आहे. अर्थात आपले विचार शाश्वतरीत्या प्रकट करून ठेवण्याकरता माणसाला खूप मर्यादी अशी चित्रलिपी प्रथम सुचली होती.
आपल्या परिचयाच्या देवनागरी लिपीमध्ये सुट्या सुट्या ध्वनींचे लेखन करण्याची पद्धत आहे.
भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" -प्रतीक-- असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणार्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. दुसऱ्याशी बोलताना कुठल्या तरी शब्दासंबंधी त्या वस्तुस्थितीची पुसट कल्पना जर एकाद्याच्या मनात डोकावली तरच त्याबाबत स्पष्टीकरण होऊन त्या दोघा माणासांच्या विचारांच्या देवाणघेवाणीत लहानमोठा अनर्थ टळू शकतो. उलट काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी आपल्या वक्तव्यात काहीकाही सन्दिग्ध शब्द ते ऐकणार्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून वापरत असतात!
काही शब्दांचे सूचितार्थ वेगवेगळ्या माणसांच्या मनात भिन्न असतात ही एक गोष्ट; त्याच्या जोडीला कितीतरी शब्दांना अगदी भिन्न असे तीन-पाच-दहा-पंधरा सर्वसंमत अर्थ असतात. ह्या गोष्टीचा उपयोग करून --शब्दश्लेष किंवा अर्थश्लेष योजून-- विनोद निर्माण करण्याची कल्पना जगातल्या सगळ्या समाजांमधे शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. त्या विनोदांमधली अनपेक्षितता श्रोत्यांचे/वाचकांचे मनोरंजन करण्याला कारणीभूत होत असते. तशा तर्हेचे विनोद करून मूळ गंभीर विषयाला पार बगल देण्याचे कामही काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी करत असतात.
तात्त्विक दृष्ट्या कोणत्याही भाषेतले शब्द ही केवळ कशी ना कशी सर्वसंमत झालेली प्रतीके आहेत. तेव्हा "नावात काय आहे? ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले --किंवा वाच्यार्थाने नाव 'ठेवले'-- तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार" अशा साधारण भाषांतराचे एक वाक्य शेक्सपिअर ह्या इंग्रजी श्रेष्ठ लेखकाने "रोमिओ ऍंड जूलिएट" ह्या आपल्या नाटकातल्या दुसऱ्या अंकात जूलिएटच्या तोंडी घातले आहे. पण ते विधान करणार्या जूलिएटला माणसाच्या मनोरचनेचे संबंधित ज्ञान उघडपणे बरेच कमी होते. पूर्वी प्रचारात असलेल्या कुठल्याही अप्रिय गोष्टीच्या संज्ञेशी काही संबंध किंवा उच्चाराचे साम्य असलेली किंवा कानाला कर्कश भासणार्या अक्षरक्रमाची एकादी संज्ञा जर कोणी कुठल्या गोष्टीला नव्याने दिली तर ती संज्ञा समाजात हळूहळू सर्वसंमत होण्याची शक्यता माणसाच्या मनोरचनेपायी सुतराम नाही. "'गु', 'ला', आणि 'ब' ह्या तीन क्रमवार अक्षरांनी मराठीभाषिकात सर्वसंमत झालेली संज्ञा असलेल्या गोष्टीला जर कोणी "ठुळाफ" किंवा "ठठठ" अशी वैकल्पिक संज्ञा सुचवली तर ती कोणी वापरेल का?" अशा आशयाचा जूलिएटला लगेच विचारलेला इंग्रजीतला प्रश्न शेक्सपियरने रोमिओच्या तोंडी घालायला हवा होता. पण नाटकातल्या त्या प्रसंगी जूलिएट आणि रोमिओ हे दोघेही मदनवशावस्थेत रममाण होते!
आपली मातृभाषा ही एकच भाषा माणसाला अवगत असली तर विशेषतः त्या परिस्थितीत त्या कुठल्याही मातृभाषेचे व्याकरण आणि तिच्यातल्या शब्दभांडाराची जी काही असेल ती मर्यादा, ह्या दोन्ही बाबींचा माणसाच्या विचारशक्तीवर, वैचारिक देवाणघेवाणीवर, आणि मग आयुष्याच्या एकूण अनुभवावर अगदी मोठा प्रभाव असतो. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणार्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त. (अर्थात माणसाने आपल्या भाषेच्या संपन्नतेचा फायदा मुळात घेतला पाहिजे हे उघड आहे.) इंग्रजी भाषेतले शब्दभांडार जगातल्या सर्व भाषांमधे सर्वांत अधिक व्यापक असल्याचे तज्ञ मानतात. असे असूनही माणसांच्या आयुष्यात ज्या 'अनंत" सूक्ष्मरीत्या भिन्न घटना घडत असतात त्यांचे शब्दांनी नीट वर्णन करायला इंग्रजी भाषेतलीही नामे, क्रियापदे, विशेषणे, आणि क्रियाविशेषणे तोकडी ठरतात. मग माणसे नाइलाजाने "किंचित", "जराशी", "काही वेळा" अशा तऱ्हेची विशेषणे/क्रियाविशेषणे विशेषणांना/क्रियाविशेषणांना जोडून वेळ भागवून नेत असतात.
भाषांच्या वर लिहिलेल्या वेगवेगळ्या मर्यादा अस्तित्वात असूनही आपण माणसे इतके विचार आणि इतरांशी विचारांच्या इतक्या देवाणीघेवाणी करू शकतो हे एक खूप मोठे आश्चर्य आहे.
आजच्या जगात लोक ६,८००हून अधिक भाषांद्वारे आणि ४१,०००हून अधिक बोलीभाषांद्वारे विचारांची देवाणघेवाण होते
कुठलीही परकी भाषा मोठेपणी बोलायला शिकले असता ती मातृभाषा असलेल्या लोकांप्रमाणे "अचूक" उच्चार करून बोलणे मोठ्या माणसांना बहुतेक कधीच जमत नाही, उलट लहान मुलांना ती गोष्ट सहज जमत असते हे माणसाच्या मेंदूचे गंमतीचे वैशिष्ट्य आहे.
मूल काही महिन्यांचे असते तेव्हापासून एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनीला ठरावीक प्रकारचा प्रतिसाद देऊ लागते असा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असावा. जेवढा सराव जास्त तेवढा विविध भाषा त्याला अवगत होतात. कानावर पडलेले शब्द तो बोलण्याचा सराव करतो.
References