वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.
'विठूरायाचं दर्शन घेणं हा एक वेगळा अनुभव आहे. महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढ महिन्यात वारी निघते. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम आहे. पंढरपूरच्या विठोबा मंदिरात जाण्यासारखा दुसरा आध्यात्मिक आनंद नाही
पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :M.A.,M.Phil.,M.D.,M.Com.,LL.B.
भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही.
तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे भारतात परंपरेने तीन महागुरू म्हणून संबोधले जातात. तीर्थे ही ऊर्जास्त्रोत मानली जातात. भारतातीय इतिहास व संतही याचे समर्थनच करतात. अगदी शंकराचार्यांपासून ते ज्ञानेश्वर, एकनाथ, विवेकानंद यांनी ते केलेले आहे. पुष्कर मेळा, गंगासागर, कुंभ मेळे, नैमिषारण्य मेळा,गंगासागर मेळा हे प्रमुख मेळावे आजही लाखोंच्या उपस्थितीत साजरे होतात. हे सर्व मेळावे याची देही याचीडोळा पाहून मी तृप्त झालेलो आहे. पण या सर्वात अद्वितीय, अद्भूत व अविस्मरणीय ठरतो तो आषाढी एकादशीला भरणारा पंढरपूरचा मेळा व वारी, जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी 'अनुभवावी'.
वारी म्हणजे देहू-आळंदी पासून पंढरपुरापर्यंत विठ्ठलनामसंकीर्तन करीत करीत २६० कि.मी.चा केलेला पायी प्रवास.याला सातशे वर्षांची अगाध परंपरा आहे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी तेराव्या शतकात वारी केल्याचा उल्लेख आढळतो. निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांसह वारी केल्याचा उल्लेख आढळतो. जगद्गुरू तुकाराम महाराजही पंढरीची वारी करत असत. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण यांनी ती परंपरा चालू ठेवली.त्याकाळी म्हणजेच १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू व आळंदीहून एकत्रितपणे जात असे.ही पालखी ज्ञानदेव व तुकोबा यांच्या पादुकांसह पायी,बैलगाडी,हत्ती-घोडे,अंबारी अश्या भव्य विलोभनीय लव्याजम्यासह मोठया दिमाखात जाई.१८६० नन्तर काही कौटुंबिक कारणांमुळे देहू व आळंदीच्या पालख्या विभक्तपणे जाऊ लागल्या.हत्ती घोडे यांचा लवाजमा कमी कमी होऊ लागला; अश्या वेळी "हैबतबाबा" यांनी पालख्यांना पुन्हा एकदा शिस्त व वळण लावले. शितोळे सरकार यांच्यातर्फे वारीच्या व्यवस्थेची व घोडयांची व्यवस्था केली गेली ती परंपरा आजपर्यंत चालू आहे.वारीच्या रिंगणातील दोन घोडे हे शितोळे सरकारांच्या घराण्याकडून आजही येतात.वारीतील आजची शिस्त,भक्तीभाव,एकरूपता,निश्चलता,सौहार्द,समर्पण आणि शरणागती याचे सर्व श्रेय हैबतबाबांना जाते म्हणून आजही आळंदीस देवळात त्यांची पायरी आहे.प्रथम त्यांना नमस्कार होतो आणि मग ज्ञानोबांना. पंढरीला जसा नामदेवांना मान आहे तसा आळंदीला हैबतबाबांना आहे.म्हणूनच आजही वारीच्या रथापुढील पहिली दिंडी हैबतबाबांची असते.
१९३२ पासून देहू व आळंदीहून वेगळ्या पालख्या निघतात. ज्ञानोबांची पालखी पुणे,आळंदी,सासवड फलटण मार्गे सोलापुरात येते तरं तुकोबांची इंदापूर मार्गे वाखरीला त्या एकत्र येतात. ४० वेळा हिमालय पदभ्रमण, सप्तकैलास, २६ वेळा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करूनही मला कधी पंढरीची वारी करता येईल असा विचारही आला नाहीं पण नर्मदा प्रदक्षिणा करताना आमचे ज्येष्ठ मित्र श्री साठे यांच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे मला तो योग लाभला व मी वारीसाठी शेडगे पंचमंडळीच्या देशमुख दिंडीत नाव नोंदवले आणि माऊलीची अनन्य कृपा बघा सहसा कधी कुणाच्या घरी न जाणारा मी आमची मैत्रीण श्रीमती कुलकर्णी यांच्या घरी मुक्कामास गेलो आणि लक्षात आले की ते मूळचे पंढरपुरचे व त्यांच्या घरी माझ्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले गेले ते पायी चालण्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरले. अशा रितीने माउलींनी माझी पूर्वतयारी करवून घेतली.
श्री.कै.केशवराव देशमुख महाराज ९-१-१८७७ ते २७-४-१९४२ जे ज्ञानेश्वरी (एम.ए.ज्ञानेश्वरी विषय घेऊन ) चे गाढे उपासक व प्रवचनकार होते.त्यांच्या प्रवचनाला तुडुंब गर्दी होत असे. त्यांची समाधी आजही पुण्याच्या ओंकारेश्वराच्या देवळात आहे व आजही त्यांच्यानंतर त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीने ७० वर्षानंतरही ही दिंडीची प्रथा सुरु आहे. यांची दिंडी रथापुढे ४ थी असते तर सर्व दिंड्या दोन गटात असतात (अ)रथापुढे व (ब) रथामागील दिंड्या. रथापुढील दिंड्या या मानाच्या म्हणून प्रसिद्ध आहेत व त्या क्रमाने रथापुढे (एकूण २४) नामगजर,हरीपाठ भजन म्हणत चालतात त्यांच्या पुढे २४ व्या दिंडीपुढे शितोळे सरकारांचे घोडे व त्यांच्यापुढे आळंदीचा नगारा असतो. त्या रथामागे जवळ जवळ २०० च्या वर दिंड्या सामील असतात. जगनाडे महाराजांची दिंडी साधारणपणे सर्वात शेवटी असते.
पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय,अवर्णनीय,अतुल्य व अद्भूत असते कारण; लाखो लोक कोणताही सांगावा अथवा निमंत्रण न देता भक्तिभावाने वारीत सामील होतात. कित्येकजण वर्षानुवर्षे वारी करतात.
वारीची पहिली सार्वजनिक जागतिक पातळीवरील नोंद B.B.C ने घेतली. त्यानंतर 'पंढरीची वारी' हा जागतिक आकर्षणाचा विषय ठरला. आज अनेक परदेशी वारकरी पण वारीत सामील होतात. एकानेव आईनाकोवा या जपानी महिला वारकरी गेली ३५ वर्षे वारी करीत आहेत. नव्हे तो एक अभ्यासाचा विषय झाला आहे. मी स्वतः व्यवस्थापनाच्या (MANAGEMENT) च्या विद्यार्थ्यांना व INTERNATIONAL BUSINESS FINANCE/TRADE च्या विद्यार्थ्यांना वारी,कुंभमेळा यांचे व्यवस्थापन,तंत्रज्ञान (MANAGEMENT TECHNOLOGY)व TRADE POTENTIAL यावर सतत PROJECT घेतले आहेत. वारीचे व्यवस्थापन हा खरोखरीचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. आज आषाढीस दिंडीत जवळ जवळ १० लाख वारकरी वय, जात-पात,लिंगभेद,दर्जा,हुद्दा न मानता पंढरपुरी येतात त्यापैकी २-३ लाख वारकरी पाऊस-पाणी,ऊन-वारा इ.गैरसोईची तमा न बाळगता, कुठल्याही सांगाव्याशिवाय वारीतून पायी पंढरपुरास येतात आणि तेही दरवर्षी न चुकता.सगळ वातावरण विठ्ठलमय झालेले असते
विठ्ठल नामाची शाळा भरली i शाल शिकताना तहानभूक हरली i i असे वातावरण असते
आजच्या जमान्यातील हे सर्वात मोठे आश्यर्य नव्हे का? कारण आज बोलावूनही कोठे उपस्थित राहण्याची मानसिकता जनसामान्यांच्यात तर नाहीच पण वेळही नाही. राजकीय मेळावे तर पैशांचा पाऊस पाडून
व स्वार्थासाठी (सर्वसाधारणपणे) भरवले जातात. आज १००- २०० चा समूह नियंत्रित करणं कठीण जात आहे.हिमालयातील बद्रीनाथ येथे रात्री शृंगार उतरविताना पाहणाऱ्या १०० माणसांवर नियंत्रण करणं कठीण जात. १०-१२ पट्टेवाले असूनही ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शृंगार उतरवताना व निर्वाण दर्शन घेताना भांडताना मी अनेकवेळा पहिले आहे. त्याउलट वारीत अनेक लाखो वारकरी शिस्तीत टाळ मृदुंग वाजवीत ४-४ च्या समूहाने एकामागे एक चालत असतात. इतरवेळी अरेरावी करणारे पोलीसही त्यांना ''माउली'' म्हणून संबोधतात. आज माझ्यासोबत सहलीला येणार्यांपैकी काही जण राहण्याची व्यवस्था, बाथरूम ( की ज्याचा १० मिनिटांवर वापर केला जात नाहीं) बघून राहायचे की नाहीं हे ठरवतात त्याचवेळी एका बाजूला लाखो वारकरी मिळेल तेथे आंघोळ करतात, कपडे धुतात व अंगावर, पाठीवर वा हातात घेवून चालत असताना वाळवतात. मिळेल तिथे नाहीतर रस्त्यावरच दुपारचा रात्रीचा विसावा घेतात दिवसा व संध्याकाळी मुकाम्मी काहीजण भजन कीर्तन करत दंग असतात तर काही स्वयंपाक करून पंगतीच्या व्यवस्थेत दंग राहतात.काहीही कटकट न करता स्वतःहून हे सर्व करतात. यावर्षी 'सदाशिव नगर' येथील रिंगण अर्धवट झाल्यामुळे बाहेर पडण्यासाठी दोन तीनच गेट असलेले मैदान आता POLICE FIRE व जनरल डायर नसूनही जालियनवाला shaबाग होतो की काय अस वाटत असतानाच कुठेही शिवीगाळ , भांडण, धक्काबुक्की न करता शांततेने सर्वजण एकामागोमाग बाहेर पडले. त्या दिवशी तर जेवणाचे सामान असणारे ट्रक आकस्मिक पोलीस वाहतूक, पोलीस नियंत्रणामुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत म्हणून हजारो वारकरी भुकेले राहिले तरीही कोणीही तोंडातून 'ब्र' काढला नाही. हे सर्व अद्भूत, अद्वितीय नाही का? वारीतील लोक एकमेकांना ''माउली''
म्हणून संबोधतात. त्यांना कोणतेही व्यसन नसते. (हल्ली आधुनिक युगानुसार काही तंबाखू , गुटका खाणारे तुरळक आहेत त्या साठी व्यसनमुक्त दिंडीही निघते). एकंदरीत कुठलातरी unwarranted, uncontrolled hand of discpline आहे हे जाणवत . स्वशिस्त (self discipline) सौहार्द , सहचर्य, सहकार्य, समर्पण आणि शरणागती या षटसुत्रींवर हे सर्व चालते व ती कुणीही कुणावरही लादत नाही.
Economics मधील आदर्श बाजार स्पर्धेतील (perfect competition ) मधील invisible hand व त्याचे आपोआप (automatic ) घडणारे कार्य, कुठल्याही बाजारी स्पर्धेशिवाय येथे प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळते आणि हा automatic force निर्माण होतो तो अध्यात्म व भक्तीभाव व पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचे प्रतिक म्हणून प्रतिष्ठीत पावलेल्या विठोबाच्या दर्शनाची नव्हे मुखदर्शनाच्या अथवा कळस दर्शनाच्या ओढीमुळे. अशिक्षित, अज्ञान वारकऱ्यांची आध्यात्मिक जाण व ज्ञान आजकालच्या सत्संगाच्या नावाखाली fashion म्हणून अभ्यास करणाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे.
आज हजारो ट्रक, ३-४ हजार ST बसेस, water tanker चहावाले, चांभार, कपडेवाले, फळ विक्रेते, गंध लावणारे यांच्या उदरनिर्वाहाचा व बाजारी संपत्ती निर्माण करण्याचा स्त्रोत वारी आणि कुंभ मेले आहेत हेही लक्षात घेणे इष्ट. निदान त्यांचे व्यापारी potentials जाणून घेणे महत्वाचे. हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी balet paper चे गणित मांडणाऱ्या राजकीय आणि शासकीय संस्थांनी वारीतील सार्वजनिक व्यवस्थापन, सुधारण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे. शासनाची एकच mobile lavatory दिसली ती पण वाल्हे गावानंतर गायब झाली. लाखोंच्यासाठी कमीत कमी ५०-६० mobile lavotary , पाणी व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन होणे महत्वाचे व अत्यंत गरजेचे आहे. पाणी, खाद्यवाटप यात दिंडी व्यवस्थापक व सार्वजनिक संस्थाच अधिक आहेत. अशा या वारीत मात्र सातारा जिल्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे शिरवळकर भेटले. ते गेली ७ वर्षे आज १०७ वर्षे वय असलेल्या आपल्या आईला खांद्यावर घेऊन वारी करीत आहेत. त्यांचे म्हणणे आजच्या पिढीला मातापित्याचे महत्व लक्षात यावे म्हणून मला पांडुरंगाने दृष्टांत दिल्यामुळे मी हे करीत आहे. आणि मग लक्षात येते ते हे की पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णु पंढरीत प्रकट झाले. देवापेक्षाही मातृपितृ सेवेला प्राधान्य देणाऱ्या पुंडलिकासाठी युगानुयुगे डोक्यावर शिवलिंग धारण करून कोणतेही शस्त्र हाती न घेता फक्त शंख हाती घेवून २८ युगे विष्णु विठ्ठल म्हणून उभा आहे. पंढरपुरातील विठोबाचे अवतरणे हेच मातृपितृभक्तीचे प्रतिक आहे हे आजच्या पिढीतील सलमान, रितिक रोशन आदर्श मानणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक करणाऱ्या पालकांनी लक्षात घेणे व तसे मूल्यशिक्षण पाल्यांना देणे महत्वाचे आहे. गणपतीलाही प्रथम पूजेचा मान आहे तो त्याच्या त्याने केलेल्या आई वडिलांच्या सेवेमुळेच .आज शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रावणबाळ, पुंडलिकाच्या आदर्शाचे मूल्य शिक्षण देणे व तेही सहजपणे उपदेशाचे डोस न पाजता होणे महत्वाचे आहे. आजच्या पिढीला पुंडलिकाचा इतिहास ज्ञात असणे महत्वाचे आहे , कारण तोही आजच्या पिढीतील बहुतांश तरुणासारखा मातापित्यांना धिक्काराणारच होता हे फार थोड्यांना माहीत असावे. त्यास कुक्कुटेश्वाराच्या देवळात (काशी \ पिठापूर येथील ) गंगा यमुना सरस्वती या त्रीदेविनी देवतांच्या साक्षात्कारासाठी मातापित्याच्या महत्वाची जाणीव झाली व पंढरपूरच्या विठोबाच्या अवतरण्याचा इतिहास रचला गेला. एवढे जरी आजच्या पिढीच्या लक्षात आले तर,'' IT IS NEVER TOO LATE ''चा विचार करून मातापित्यांची सेवा करण्याची बुद्धी व कार्य व्हावे. कारण आजचे तरुण हे उद्याचे मातापिता व जेष्ठ नागरिक होणार आहेत व ''पेरिले तेच उगवते'' या न्यायाने त्यांनी योग्य पेरणी करावी म्हणून हा लेख प्रपंच.
आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार , लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुध्दा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.[१][३]वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.[४][५] ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.[६]संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[७] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते
वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.[१] आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.
तुळशीमाळा
'स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा.नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.
सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[९]
वारकरी महावाक्य-
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवतुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. [१०] संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे." [९] ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल-
हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते . हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक संगणक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.[१२]
ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा[१३]ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.
तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेवून प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.[११] महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकाराम च्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात
वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.[१५] वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते.
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.[६]
धावा-
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात
आळंदी-पुणे-सासवड- लोण्ंद- फलटण - नातेपुते-माळशिरस- वेळापुर- भंडिशेगा-वाखरि-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते.
वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत
पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारक-यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते. सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारक-यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात
वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालकी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फेकेली जाते
आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र्रचेमुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. [२१][२२]त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते
देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकऱ्याना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७)
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
25 of 27 replies
वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!
पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.
'विठूरायाचं दर्शन घेणं हा एक वेगळा अनुभव आहे. महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढ महिन्यात वारी निघते. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम आहे. पंढरपूरच्या विठोबा मंदिरात जाण्यासारखा दुसरा आध्यात्मिक आनंद नाही
पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :M.A.,M.Phil.,M.D.,M.Com.,LL.B.
भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही.
तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे भारतात परंपरेने तीन महागुरू म्हणून संबोधले जातात. तीर्थे ही ऊर्जास्त्रोत मानली जातात. भारतातीय इतिहास व संतही याचे समर्थनच करतात. अगदी शंकराचार्यांपासून ते ज्ञानेश्वर, एकनाथ, विवेकानंद यांनी ते केलेले आहे. पुष्कर मेळा, गंगासागर, कुंभ मेळे, नैमिषारण्य मेळा,गंगासागर मेळा हे प्रमुख मेळावे आजही लाखोंच्या उपस्थितीत साजरे होतात. हे सर्व मेळावे याची देही याचीडोळा पाहून मी तृप्त झालेलो आहे. पण या सर्वात अद्वितीय, अद्भूत व अविस्मरणीय ठरतो तो आषाढी एकादशीला भरणारा पंढरपूरचा मेळा व वारी, जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी 'अनुभवावी'.
वारी म्हणजे देहू-आळंदी पासून पंढरपुरापर्यंत विठ्ठलनामसंकीर्तन करीत करीत २६० कि.मी.चा केलेला पायी प्रवास.याला सातशे वर्षांची अगाध परंपरा आहे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी तेराव्या शतकात वारी केल्याचा उल्लेख आढळतो. निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांसह वारी केल्याचा उल्लेख आढळतो. जगद्गुरू तुकाराम महाराजही पंढरीची वारी करत असत. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण यांनी ती परंपरा चालू ठेवली.त्याकाळी म्हणजेच १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू व आळंदीहून एकत्रितपणे जात असे.ही पालखी ज्ञानदेव व तुकोबा यांच्या पादुकांसह पायी,बैलगाडी,हत्ती-घोडे,अंबारी अश्या भव्य विलोभनीय लव्याजम्यासह मोठया दिमाखात जाई.१८६० नन्तर काही कौटुंबिक कारणांमुळे देहू व आळंदीच्या पालख्या विभक्तपणे जाऊ लागल्या.हत्ती घोडे यांचा लवाजमा कमी कमी होऊ लागला; अश्या वेळी "हैबतबाबा" यांनी पालख्यांना पुन्हा एकदा शिस्त व वळण लावले. शितोळे सरकार यांच्यातर्फे वारीच्या व्यवस्थेची व घोडयांची व्यवस्था केली गेली ती परंपरा आजपर्यंत चालू आहे.वारीच्या रिंगणातील दोन घोडे हे शितोळे सरकारांच्या घराण्याकडून आजही येतात.वारीतील आजची शिस्त,भक्तीभाव,एकरूपता,निश्चलता,सौहार्द,समर्पण आणि शरणागती याचे सर्व श्रेय हैबतबाबांना जाते म्हणून आजही आळंदीस देवळात त्यांची पायरी आहे.प्रथम त्यांना नमस्कार होतो आणि मग ज्ञानोबांना. पंढरीला जसा नामदेवांना मान आहे तसा आळंदीला हैबतबाबांना आहे.म्हणूनच आजही वारीच्या रथापुढील पहिली दिंडी हैबतबाबांची असते.
१९३२ पासून देहू व आळंदीहून वेगळ्या पालख्या निघतात. ज्ञानोबांची पालखी पुणे,आळंदी,सासवड फलटण मार्गे सोलापुरात येते तरं तुकोबांची इंदापूर मार्गे वाखरीला त्या एकत्र येतात. ४० वेळा हिमालय पदभ्रमण, सप्तकैलास, २६ वेळा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करूनही मला कधी पंढरीची वारी करता येईल असा विचारही आला नाहीं पण नर्मदा प्रदक्षिणा करताना आमचे ज्येष्ठ मित्र श्री साठे यांच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे मला तो योग लाभला व मी वारीसाठी शेडगे पंचमंडळीच्या देशमुख दिंडीत नाव नोंदवले आणि माऊलीची अनन्य कृपा बघा सहसा कधी कुणाच्या घरी न जाणारा मी आमची मैत्रीण श्रीमती कुलकर्णी यांच्या घरी मुक्कामास गेलो आणि लक्षात आले की ते मूळचे पंढरपुरचे व त्यांच्या घरी माझ्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले गेले ते पायी चालण्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरले. अशा रितीने माउलींनी माझी पूर्वतयारी करवून घेतली.
श्री.कै.केशवराव देशमुख महाराज ९-१-१८७७ ते २७-४-१९४२ जे ज्ञानेश्वरी (एम.ए.ज्ञानेश्वरी विषय घेऊन ) चे गाढे उपासक व प्रवचनकार होते.त्यांच्या प्रवचनाला तुडुंब गर्दी होत असे. त्यांची समाधी आजही पुण्याच्या ओंकारेश्वराच्या देवळात आहे व आजही त्यांच्यानंतर त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीने ७० वर्षानंतरही ही दिंडीची प्रथा सुरु आहे.
यांची दिंडी रथापुढे ४ थी असते तर सर्व दिंड्या दोन गटात असतात (अ)रथापुढे व (ब) रथामागील दिंड्या. रथापुढील दिंड्या या मानाच्या म्हणून प्रसिद्ध आहेत व त्या क्रमाने रथापुढे (एकूण २४) नामगजर,हरीपाठ भजन म्हणत चालतात त्यांच्या पुढे २४ व्या दिंडीपुढे शितोळे सरकारांचे घोडे व त्यांच्यापुढे आळंदीचा नगारा असतो. त्या रथामागे जवळ जवळ २०० च्या वर दिंड्या सामील असतात. जगनाडे महाराजांची दिंडी साधारणपणे सर्वात शेवटी असते.
पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय,अवर्णनीय,अतुल्य व अद्भूत असते कारण; लाखो लोक कोणताही सांगावा अथवा निमंत्रण न देता भक्तिभावाने वारीत सामील होतात. कित्येकजण वर्षानुवर्षे वारी करतात.
वारीची पहिली सार्वजनिक जागतिक पातळीवरील नोंद B.B.C ने घेतली. त्यानंतर 'पंढरीची वारी' हा जागतिक आकर्षणाचा विषय ठरला. आज अनेक परदेशी वारकरी पण वारीत सामील होतात. एकानेव आईनाकोवा या जपानी महिला वारकरी गेली ३५ वर्षे वारी करीत आहेत. नव्हे तो एक अभ्यासाचा विषय झाला आहे. मी स्वतः व्यवस्थापनाच्या (MANAGEMENT) च्या विद्यार्थ्यांना व INTERNATIONAL BUSINESS FINANCE/TRADE च्या विद्यार्थ्यांना वारी,कुंभमेळा यांचे व्यवस्थापन,तंत्रज्ञान (MANAGEMENT TECHNOLOGY)व TRADE POTENTIAL यावर सतत PROJECT घेतले आहेत. वारीचे व्यवस्थापन हा खरोखरीचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. आज आषाढीस दिंडीत जवळ जवळ १० लाख वारकरी वय, जात-पात,लिंगभेद,दर्जा,हुद्दा न मानता पंढरपुरी येतात त्यापैकी २-३ लाख वारकरी पाऊस-पाणी,ऊन-वारा इ.गैरसोईची तमा न बाळगता, कुठल्याही सांगाव्याशिवाय वारीतून पायी पंढरपुरास येतात आणि तेही दरवर्षी न चुकता.सगळ वातावरण विठ्ठलमय झालेले असते
विठ्ठल नामाची शाळा भरली i
शाल शिकताना तहानभूक हरली i i असे वातावरण असते
आजच्या जमान्यातील हे सर्वात मोठे आश्यर्य नव्हे का? कारण आज बोलावूनही कोठे उपस्थित राहण्याची मानसिकता जनसामान्यांच्यात तर नाहीच पण वेळही नाही. राजकीय मेळावे तर पैशांचा पाऊस पाडून
व स्वार्थासाठी (सर्वसाधारणपणे) भरवले जातात. आज १००- २०० चा समूह नियंत्रित करणं कठीण जात आहे.हिमालयातील बद्रीनाथ येथे रात्री शृंगार उतरविताना पाहणाऱ्या १०० माणसांवर नियंत्रण करणं कठीण जात. १०-१२ पट्टेवाले असूनही ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शृंगार उतरवताना व निर्वाण दर्शन घेताना भांडताना मी अनेकवेळा पहिले आहे. त्याउलट वारीत अनेक लाखो वारकरी शिस्तीत टाळ मृदुंग वाजवीत ४-४ च्या समूहाने एकामागे एक चालत असतात. इतरवेळी अरेरावी करणारे पोलीसही त्यांना ''माउली'' म्हणून संबोधतात. आज माझ्यासोबत सहलीला येणार्यांपैकी काही जण राहण्याची व्यवस्था, बाथरूम ( की ज्याचा १० मिनिटांवर वापर केला जात नाहीं) बघून राहायचे की नाहीं हे ठरवतात त्याचवेळी एका बाजूला लाखो वारकरी मिळेल तेथे आंघोळ करतात, कपडे धुतात व अंगावर, पाठीवर वा हातात घेवून चालत असताना वाळवतात. मिळेल तिथे नाहीतर रस्त्यावरच दुपारचा रात्रीचा विसावा घेतात दिवसा व संध्याकाळी मुकाम्मी काहीजण भजन कीर्तन करत दंग असतात तर काही स्वयंपाक करून पंगतीच्या व्यवस्थेत दंग राहतात.काहीही कटकट न करता स्वतःहून हे सर्व करतात. यावर्षी 'सदाशिव नगर' येथील रिंगण अर्धवट झाल्यामुळे बाहेर पडण्यासाठी दोन तीनच गेट असलेले मैदान आता POLICE FIRE व जनरल डायर नसूनही जालियनवाला shaबाग होतो की काय अस वाटत असतानाच कुठेही शिवीगाळ , भांडण, धक्काबुक्की न करता शांततेने सर्वजण एकामागोमाग बाहेर पडले. त्या दिवशी तर जेवणाचे सामान असणारे ट्रक आकस्मिक पोलीस वाहतूक, पोलीस नियंत्रणामुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत म्हणून हजारो वारकरी भुकेले राहिले तरीही कोणीही तोंडातून 'ब्र' काढला नाही. हे सर्व अद्भूत, अद्वितीय नाही का? वारीतील लोक एकमेकांना ''माउली''
म्हणून संबोधतात. त्यांना कोणतेही व्यसन नसते. (हल्ली आधुनिक युगानुसार काही तंबाखू , गुटका खाणारे तुरळक आहेत त्या साठी व्यसनमुक्त दिंडीही निघते). एकंदरीत कुठलातरी unwarranted, uncontrolled hand of discpline आहे हे जाणवत . स्वशिस्त (self discipline) सौहार्द , सहचर्य, सहकार्य, समर्पण आणि शरणागती या षटसुत्रींवर हे सर्व चालते व ती कुणीही कुणावरही लादत नाही.
Economics मधील आदर्श बाजार स्पर्धेतील (perfect competition ) मधील invisible hand व त्याचे आपोआप (automatic ) घडणारे कार्य, कुठल्याही बाजारी स्पर्धेशिवाय येथे प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळते आणि हा automatic force निर्माण होतो तो अध्यात्म व भक्तीभाव व पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचे प्रतिक म्हणून प्रतिष्ठीत पावलेल्या विठोबाच्या दर्शनाची नव्हे मुखदर्शनाच्या अथवा कळस दर्शनाच्या ओढीमुळे. अशिक्षित, अज्ञान वारकऱ्यांची आध्यात्मिक जाण व ज्ञान आजकालच्या सत्संगाच्या नावाखाली fashion म्हणून अभ्यास करणाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे.
आज हजारो ट्रक, ३-४ हजार ST बसेस, water tanker चहावाले, चांभार, कपडेवाले, फळ विक्रेते, गंध लावणारे यांच्या उदरनिर्वाहाचा व बाजारी संपत्ती निर्माण करण्याचा स्त्रोत वारी आणि कुंभ मेले आहेत हेही लक्षात घेणे इष्ट. निदान त्यांचे व्यापारी potentials जाणून घेणे महत्वाचे. हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी balet paper चे गणित मांडणाऱ्या राजकीय आणि शासकीय संस्थांनी वारीतील सार्वजनिक व्यवस्थापन, सुधारण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे. शासनाची एकच mobile lavatory दिसली ती पण वाल्हे गावानंतर गायब झाली. लाखोंच्यासाठी कमीत कमी ५०-६० mobile lavotary , पाणी व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन होणे महत्वाचे व अत्यंत गरजेचे आहे. पाणी, खाद्यवाटप यात दिंडी व्यवस्थापक व सार्वजनिक संस्थाच अधिक आहेत.
अशा या वारीत मात्र सातारा जिल्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे शिरवळकर भेटले. ते गेली ७ वर्षे आज १०७ वर्षे वय असलेल्या आपल्या आईला खांद्यावर घेऊन वारी करीत आहेत. त्यांचे म्हणणे आजच्या पिढीला मातापित्याचे महत्व लक्षात यावे म्हणून मला पांडुरंगाने दृष्टांत दिल्यामुळे मी हे करीत आहे.
आणि मग लक्षात येते ते हे की पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णु पंढरीत प्रकट झाले. देवापेक्षाही मातृपितृ सेवेला प्राधान्य देणाऱ्या पुंडलिकासाठी युगानुयुगे डोक्यावर शिवलिंग धारण करून कोणतेही शस्त्र हाती न घेता फक्त शंख हाती घेवून २८ युगे विष्णु विठ्ठल म्हणून उभा आहे. पंढरपुरातील विठोबाचे अवतरणे हेच मातृपितृभक्तीचे प्रतिक आहे हे आजच्या पिढीतील सलमान, रितिक रोशन आदर्श मानणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक करणाऱ्या पालकांनी लक्षात घेणे व तसे मूल्यशिक्षण पाल्यांना देणे महत्वाचे आहे. गणपतीलाही प्रथम पूजेचा मान आहे तो त्याच्या त्याने केलेल्या आई वडिलांच्या सेवेमुळेच .आज शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रावणबाळ, पुंडलिकाच्या आदर्शाचे मूल्य शिक्षण देणे व तेही सहजपणे उपदेशाचे डोस न पाजता होणे महत्वाचे आहे. आजच्या पिढीला पुंडलिकाचा इतिहास ज्ञात असणे महत्वाचे आहे , कारण तोही आजच्या पिढीतील बहुतांश तरुणासारखा मातापित्यांना धिक्काराणारच होता हे फार थोड्यांना माहीत असावे. त्यास कुक्कुटेश्वाराच्या देवळात (काशी \ पिठापूर येथील ) गंगा यमुना सरस्वती या त्रीदेविनी देवतांच्या साक्षात्कारासाठी मातापित्याच्या महत्वाची जाणीव झाली व पंढरपूरच्या विठोबाच्या अवतरण्याचा इतिहास रचला गेला. एवढे जरी आजच्या पिढीच्या लक्षात आले तर,'' IT IS NEVER TOO LATE ''चा विचार करून मातापित्यांची सेवा करण्याची बुद्धी व कार्य व्हावे. कारण आजचे तरुण हे उद्याचे मातापिता व जेष्ठ नागरिक होणार आहेत व ''पेरिले तेच उगवते'' या न्यायाने त्यांनी योग्य पेरणी करावी म्हणून हा लेख प्रपंच.
आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार , लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुध्दा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.[१] [३]वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.[४][५] ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.[६] संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[७] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते
वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.[१] आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.
तुळशीमाळा
'स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा.नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.
सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[९]
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. [१०] संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे." [९] ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल-
वारीचे दोन प्रकार आहेत.
या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.[
हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते . हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक संगणक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.[१२]
ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा[१३]ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.
तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेवून प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.[११] महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकाराम च्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात
वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.[१५] वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते.
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.[६]
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात
आळंदी-पुणे-सासवड- लोण्ंद- फलटण - नातेपुते-माळशिरस- वेळापुर- भंडिशेगा-वाखरि-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते.
वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत
पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारक-यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते. सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारक-यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात
वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालकी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फेकेली जाते
आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र्रचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. [२१] [२२]त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते
देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकऱ्याना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७)
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
वारी या विषयावर २०१८ साली आंतरराष्ट्रीय परिषदेत अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला गेला आहे